Marathi
- Home
- Marathi
ll श्री ll
कोकण खऱ्या अर्थाने अनुभवायचं तर तिथं छान मुक्कामालाच जायला हवं. तिथे जर घरासारखं अगत्य असेल , फिरण्याबरोबरच आरामच सुख असेल आणि आयतं सुग्रास जेवण असेल तर मग काय सोने पे सुहागाच.
नांदगाव येथील बीच हेवन व्हिला म्हणजे अगदी तुमच्या मनातली जागा. अलिबाग मुरुड मुख्य रस्त्यावरील सिद्धिविनायक मंदिराजवळील नांदगाव या निसर्गरम्य ठिकाणी वसलं आहे बीच हेवन व्हिला. कोकणातलं तुमचं घर /तुमच्या मनातलं गाव.
बीच हेवन व्हिला ऐसपैस जागेत वसला आहे . / आहे/ विस्तारला आहे.
व्हिलाच्या चहुबाजूंनी 5 फूट लांबीची सीमा भिंत आहे. म्हणजे सुरक्षिततेची ग्वाहीच. इथे आल्या क्षणी लाटांचा आवाज तुमचं स्वागत करतो. व्हिलाच्या मागे विशाल अरबी समुद्र आहे. तो नजरेत साठवून घ्या. समुद्राची गाज आणि अथांगता , सुखद हवा आणि वातवरणातील प्रसन्नता अनुभवताना मनातल्या सगळ्या कुशंका काढून टाका. लक्षात ठेवा की हा सर्वात सुरक्षित समुद्रकिनारा आहे.
हेच निश्चिन्त आणि आरामदायी वातावरण तुम्हाला व्हिला मध्ये ही अनुभवता येते. बीच हेवन व्हिला यात आठ सुसज्ज स्वतंत्र वातानुकूलित स्वीट्स आहेत. यातील पाच स्वीटमध्ये आहे प्रशस्त डबल बेड आणि एक सोफा कम बेड. तर तीन
स्वीटमध्ये आहे couple bed आणि एक child bed. याशिवाय प्रत्येक
स्वीटमध्ये तुमच्या बॅगा ,कपडे ठेवायला कपाटाची सोय आहे. याशिवाय एक टेबल, 2 खुर्च्या आणि एक टीव्हीही आहे . प्रत्येक स्वीट मधील स्नानगृह सौर आणि स्टोरेज अशा दोन्ही गीझर्स आणि आधुनिक सोयींनी युक्त आहेत. प्रत्येक स्वीटमध्ये गप्पा टप्पा, पत्ते , वाचन किंवा निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आहे प्रशस्त बाल्कनी .
पोटोबाची सोय तळमजल्यावर केली आहे.
तळमजल्यावर एक मोठ्या हॉलमध्ये परिपूर्ण किचन आहे. तुमच्या रसना तृप्तीसाठी पूर्णवेळ खानसामे इथे आहेत. शिवाय तळमजल्यावर तसेच पहिल्या मजल्यावर स्वतंत्र टीव्ही रूम आहे.
बीच हेवन व्हिलाच्या पुढच्या आणि मागील बाजूस 8000 sft ची जागा आहे. इथे विविध प्रकारच्या झाडांची वनराई आहे. इथल्या झाडांचे प्रकार, फुलांचे वास ,पक्ष्यांचा किलबिलाट आणि रंगाची उधळण असं निसर्गरम्य वातावरण तुम्ही तिथे फिरून किंवा हॅमॉक वर आराम करत अनुभवू शकता.
समुद्रात डुंबायचा कंटाळा आला तर व्हिलामधेच फिल्टरेशन प्लांटसह स्विमिंग पूल आहे. पुलाच्या बाहेरच जवळ ओपन-एअर डायनिंग ची सुविधा आहे. इथे बसून तुम्ही बारबेक्यूचा ही आनंद घेऊ शकता.
तुम्हाला जवळपास फिरण्यासाठी इथे अनेक ठिकाणं आहेत. बीच हेवन व्हिलापासून काशीद बीच ५ किलोमीटरवर आहे. नवाब राजवाडा ८ किलोमीटरवर आहे . फणसाड अभयरण्य ९ किमी अंतरावर आहे. मुरुड जंजिरा १० किलोमीटरवर आहे तर बिर्ला मंदिर 20 किमी अंतरावर आहे.
तुमच्या वाहनांसाठी इथे पुरेशी कार पार्किंग उपलब्ध आहेतच शिवाय तुमच्या सोबत येणाऱ्या वाहनचालकांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्थाही आहे.
बीच हेवन व्हिलाने तुमचा इथला निवास आनंदाने परिपूर्ण व्हावा यासाठी तुमच्या प्रत्यक्ष गरजांचा विचार करून सोयी उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय इथे एक पूर्ण-वेळ केअरटेकरही आहे.
मग कधी येताय मुक्कामाला?
आम्ही वाट बघतोय / आम्ही स्वागताला सिद्ध आहोत.